खुर्चीवर बसून किंवा बैठे काम करणे ही बऱ्याच जणांची मजबुरी झाली आहे या कारणामुळे कंबर दुखणे(Lower Backpain) किंवा अवघडल्यासारखे वाटणे यासारख्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत यांचा जर समूळ नायनाट करायचा असेल तर खाली दिलेले योगासन नियमित करा आपली या त्रासापासून निश्चितच मुक्तता होईल.
ऑफिसमध्ये तासंतास खुर्ची वरती बसून कमरेच्या मसल्स मध्ये खूप पेन होतो कंबर आखडल्यासारखी वाटते या समस्यांसाठी अर्धचक्रासन खूप फायदेशीर आहे या आसनाच्या नियमित सरावाने आपला त्रास कायमचा बरा होईल. चला तर जाणून घेऊया या असण्याबद्दल…
अर्धचक्रासन करण्याची पद्धत (Ardhachakrasana)
- दोन्ही पायांमध्ये थोडेसे अंतर ठेवा
- दोन्ही पाय एकमेकास समांतर असावेत
- दोन्ही हात कमरेच्या पाठीमागे घेऊन एकमेकांना पकडावे.
- श्वास घेत कमरेतून थोडेसे पाठीमागे झुकावे याचबरोबर डोके देखील पाठीमागच्या बाजूने घेऊन जावे आणि हातांना शरीरापासून लांब ओढावे.
- डोळे उघडे ठेवावेत व आपले दोन्ही जबडे एकमेकांना मिळालेले असावेत.
- आता श्वासाची गती सामान्य ठेवून जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ या आसनामध्येच राहावे. व नंतर हळूहळू कंबर आणि मान सरळ करावे.
- आता दोन्ही हात सोडून आपल्या पूर्वस्थितीमध्ये यावे.
- या व्यायामाचे कमीत कमी पाच सेट करावेत.
या आसनाचे फायदे
- या आसनाच्या नियमित सरावाने पुढे झुकून चालण्याची सवय कमी होईल.
- हे आसन आपल्या खांद्यांना पाठीमागे घेऊन जाण्यास मदत करेल ज्यामुळे आपले पोष्चर ठीक होईल.
- वारंवार खुर्चीवर बसून किंवा पुढे वाकून काम केल्यामुळे ज्या वेदना कमरेमध्ये निर्माण होतात त्या वेदना दूर करण्यासाठी हे आसन अतिशय फायदेशीर आहे.
- हे असं अतिशय सहजतेने कोठेही उभे राहून करता येऊ शकते.
- यामुळे मान पाठ आणि कमरेच्या मास पेशींना ताकद मिळते व त्या लवचिक होतात. त्याचबरोबर नर्वस सिस्टीम स्ट्रॉंग होण्यासाठी देखील मदत होते.
- आपला पाठीचा मनका लवचिक होतो व पाठीच्या सर्व आजारांपासून मुक्तता मिळते.
त्याचबरोबर खालील काळजी नक्की घ्या
- नेहमी सरळ बसा ,पुढे झुकून चालणे किंवा बसणे शक्यतो टाळा
- आपली कंबर जेवढी सरळ असते तेवढा आपल्यामध्ये उत्साह आणि ऊर्जा असते त्यामुळे नेहमी सरळ आणि ताट बसा.
- त्याचबरोबर दिवसभरात जेवढे जास्त शक्य आहे तेवढे मोठे श्वास घेण्याची सवय लावा.
- या आसनाच्या मदतीने आपला कंबरदुखीचा त्रास कायमचा बरा होईल व कमरेच्या मसल्स मध्ये ज्या वेदना होतात त्या वेदना होणार नाहीत.