Site icon Aarogyaniti

पांढरे झालेले केस पुन्हा काळे करायचे आहेत तर करा हे घरगुती उपाय (Gray hair solution in marathi)

पांढऱ्या केसांची समस्या ही फक्त आता वृद्ध व्यक्तींमध्येच राहिलेली नाही, आजकाल लहान मुलांमध्ये सुद्धा ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जर तुमचे सुद्धा वय कमी असेल आणि केस पांढरे(White hairs) झाले असतील तर तुम्हाला केसांकडे लक्ष देण्याची गरज आहे. आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला या समस्येपासून कशी सुटका मिळवायची व आपले केस मजबूत आणि दाट कसे बनवायचे याबद्दल सांगणार आहे, तरी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.

केस पांढरे होण्याची कारणे (Reasons of white hair)

पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती टिप्स (Tips to turn white hair to black)

आपल्या दैनंदिन जीवनातील वापरात असणारे असे काही पदार्थ आहेत की ज्याचा वापर करून आपण आपले पांढरे झालेले केस परत काळे करू शकतो. फक्त केमिकल युक्त पदार्थांचा वापर करूनच केस काळे होतात असे नाही तर त्यासाठी अनेक नैसर्गिक (Natural) पदार्थ आहेत. चला तर पाहूया त्या संदर्भात.

कांदा(Onion) –


कांद्याच्या रसाचा वापर करून तुम्ही पुन्हा तुमच्या केस पूर्वीप्रमाणे काळे करू शकता. कांद्याचा रस काढून तुम्हाला तो तुमच्या केसावर लावायचा आहे व काही वेळानंतर आपले केस पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे, असे काही दिवस सातत्याने केल्यास तुम्हाला फरक दिसून येईल.

कच्ची पपई(Papaya) –


कच्च्या पपईचा वापर करून तुम्ही तुमचे पुन्हा एकदा काळे करू शकता. एक कच्ची पपई घेऊन त्याला किसून त्याची पेस्ट तयार करावी, व ती वीस मिनिटापर्यंत केसाला अप्लाय करावी व नंतर धुवून टाकावी.

आवळा पेस्ट(Aamla) –


आवळा हा केसांसाठी गुणकारी असतो हे सर्वांनाच माहीत आहे. आवळ्याची पेस्ट करून ती केसासाठी वापरल्यास केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. आवळ्याची पेस्ट तयार करण्यासाठी चार ते सहा आवळे घ्यावे आणि त्यांना घासून त्याची पेस्ट तयार करावी. त्यानंतर ही तयार झालेली पेस्ट काही वेळासाठी आपल्या केसांना लावून ठेवावी, केस सुकल्यानंतर आपले केस धुऊन घ्यावे.

कढीपत्ता आणि नारळाचे तेल(Coconut Oil) –


केसांसाठी तुम्ही कढीपत्ता आणि नारळाच्या तेलाचा सुद्धा उपयोग करू शकता. नारळाचे तेल आणि कढीपत्ता मिक्स करून त्याचा वापर आपण केसांसाठी करू शकतो. याच्या वापराने केस मजबूत होण्यास मदत होते.

बदाम तेल लिंबाचा रस आणि आवळ्याचा रस(Badam tel,Aamla juice,Lemon) –


एका वाटीमध्ये चार चमचे बदामाचे तेल एक चमचा लिंबाचा रस आणि एक आवळा टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यावे व त्यांचा केसांसाठी वापर करावा.

तीळ आणि गाजराचे तेल(Til Oil) –


चार मोठे चमचे तिळाचे तेल आणि अर्धा चमचा गाजराच्या बियाचे तेल घेऊन ते चांगल्या पद्धतीने मिक्स करावे जेव्हा ते दोन्ही व्यवस्थित मिक्स होतील तेव्हा त्याचा केसाला लावण्यासाठी वापर करावा. याच्या वापराने केसांना नक्की फायदा होईल.

योगासने(Yoga) –


योगासनांच्या मदतीने तुम्ही वयाच्या आधी झालेले पांढरे केस परत काळे करू शकता. तसेच आपले केस मजबूत बनवू शकता. यामध्ये आपल्या दोन्ही हातांच्या नखांना एकमेकांवरती घासायचे आहे, याचबरोबर भ्रामरी प्राणायाम, कपालभाती, आणि भुजंगासनासारखे योगासने करावेत. सातत्याने आणि नियमित या योगासनांचा अभ्यास केल्यास त्याचा केसांना फायदा होतो.

बायोटीन युक्त पदार्थांचा वापर करणे(Biotin rich Products) –


बायोटीन हे केसांना अनेक वर्षांपर्यंत काळे ठेवण्याचे काम करते तसेच पांढरे केसांना ते पुन्हा काळे करते. म्हणून बायोटीन युक्त पदार्थांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करावा. ज्या पदार्थांमध्ये बायोटिन आहे असे पदार्थ खावे.

विटामिन बी 12 युक्त आहार घ्या(Vit B12 Rich Food) –


ज्या पदार्थांमध्ये विटामिन बी 12 भरपूर प्रमाणात आहे अशा पदार्थांचा वापर जेवणामध्ये करा. जसे की पनीर संत्री कॅनबेरी एवोकॅडो या पदार्थांमध्ये विटामिन बी 12 भरपूर प्रमाणात असते. हे पदार्थ केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त असतात.

काळे तीळ(Black Til) –


त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे आढळून येतात, तसेच तिळामध्ये विटामिन्स भरपूर प्रमाणात असतात. हे केसांचे गळणे कमी करून त्यांना मजबूत बनवण्याचे काम करतात. तीळ पाण्यामध्ये थोडा वेळ भिजू द्या त्यानंतर ते मिक्सरमध्ये काढून त्याची पेस्ट करा. तयार झालेली ही पेस्ट आपल्या केसांना व्यवस्थित लावा आणि मसाज करा आणि अर्ध्या तासानंतर पाण्याने धुऊन काढा. आठवड्यातून एक दिवस तुम्ही याचा वापर करू शकता.

वरील सर्व उपाय आहेत आपण घरच्या घरी करू शकतो, परंतु जर हे उपाय करत असताना काही त्रास झाल्यास त्वरित हे उपचार बंद करावे व आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आपल्याला हे देखील वाचायला आवडेल

सर्वांगीण आरोग्यासाठी करा ज्ञान मुद्रा. आश्चर्यचकित करणारे फायदे येतील समोर

कमरेच्या मसल्स मध्ये आहेत खूप वेदना तर करा ही योगासने वेदना होतील गायब

बनाने में आसान और सेहत के लिए बहुत फायदेमंद है मेथी के ठेपले

Exit mobile version