योग्य पद्धतीने व्यायाम कसा करावा, सोप्या पण असरदार टिप्स.(10 Tips for Proper Exercise/Vyayam Techniques in marathi)

दररोज नियमितपणे व्यायाम करणे हे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. यामुळे आपल्या शरीरावर तर सकारात्मक परिणाम होतातच परंतु आपल्या मानसिकतेमध्ये सुद्धा खूप मोठा बदल दिसून येतो व आपले मानसिक स्वास्थ्य सुधारते. नियमितपणे व्यायाम केल्याने हृदय तंदुरुस्त होते, रक्तदाब नियंत्रित राहतो व यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा वाढते(Boost your energy. याचबरोबर व्यायाम आपले वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतो आणि शरीराला रोगांपासून वाचण्यासाठी सक्षम बनवतो.

योग्य पद्धतीने केलेला व्यायाम(Exercise) आपली ऊर्जा वाढवतो व आपल्याला दैनंदिन कामे करताना थकवा जाणवत नाही. म्हणूनच आपण आज या ब्लॉगमध्ये योग्य पद्धतीने व्यायाम कसा करावा? याबद्दल माहिती घेणार आहोत त्यामुळे ब्लॉक शेवटपर्यंत नक्की वाचा.
व्यायाम करत असताना व्यायामाची पद्धत ही योग्य असली पाहिजे, ज्यामुळे आपल्याला व्यायामाचे पूर्ण फायदे(Benefits) मिळतील आणि त्याचबरोबर व्यायामामुळे होणाऱ्या काही इंजुरी होणार नाहीत. त्यासाठी व्यायामाची योग्य पद्धत माहिती असणे गरजेचे आहे. ज्यावेळी आपण व्यायाम योग्य पद्धतीने करत नाही तेव्हा आपल्याला व्यायामाचा फायदा तर सोडाच परंतु त्याचे नुकसान भोगावे लागतात.

व्यायाम योग्य पद्धतीने केल्यास आपल्या मास पेशींमध्ये ताकद निर्माण होते शारीरिक बल वाढते आणि शरीराच्या कार्यामध्ये सुधारणा होते. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की कुठलाही व्यायाम करताना त्या व्यायामाची संपूर्ण माहिती, व्यायाम करण्यासाठी टिप्स, व्यायाम कधी करावा, व्यायाम कोणी करू नये… या सर्व गोष्टी जाणून घेणे गरजेचे असते जेणेकरून आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार नाहीत.

व्यायामाचे महत्त्व(Vyayam ke Mahatva)

व्यायाम हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असला पाहिजे, आपल्याला व्यायामामुळे फक्त शारीरिक फायदा होत नाही तर आपल्याला मानसिक आणि आत्मिक सुख मिळवण्यासाठी सुद्धा व्यायाम हा गरजेचा असतोच. आज कालच्या या धावपळीच्या युवा व्यायाम हे एक ब्रम्हास्त्रच आहे, जे आपल्याला नेहमी सकारात्मक ठेवून निरोगी राहण्यास मदत करते.
व्यायाम केल्यामुळे आपले हृदय निरोगी राहते रक्तसंचार व्यवस्थित होतो, ज्यामुळे आपल्याला ताजेतवाने वाटायला लागते.

व्यायाम हा ऊर्जा आणि सकारात्मक भावना देतो त्यामुळे दिवसभर काम करण्यासाठी आपल्याला उत्साहित राहता येते. व्यायामामुळे आपल्या शरीराची दृढता वाढते व मानसिक स्थितीमध्ये सुधार होतो ज्यामुळे आपल्याला जीवनात येणाऱ्या समस्या ज्या लहान असो किंवा मोठ्या त्यांचा सामना करताना कुठलीही अडचण येत नाही.
याच्या व्यतिरिक्त व्यायामाचे आपल्याला असंख्य असे फायदे होतात. जसे की वजन नियंत्रित राहणे, सकाळी सकाळी ताजेतवाने वाटणे, आपल्या सेल्फ कॉन्फिडन्स मध्ये वाढ झाल्याचे जाणवणे इत्यादी. म्हणून व्यायामाचा आपल्या जीवनात समावेश करणे महत्त्वपूर्णच नाही तर अति आवश्यक असा भाग आहे.

योग्य पद्धतीने व्यायाम म्हणजे नेमकं काय? (Sahi Vyayam kise kehate hain)

योग्य पोस्चर आणि स्थिती (Posture ani Sthiti)


व्यायाम करत असताना शरीराची स्थिती आणि पोस्चर हे योग्यच असले पाहिजे. योग्य स्थितीमध्ये राहून व्यायाम केल्यानंतर त्याचा मास पेशी आणि शरीराला योग्य फायदा होतो, अन्यथा इंजुरी होण्याची शक्यता असते.

श्वासावर नियंत्रण (Breathing Technique)


व्यायाम करताना श्वास घेण्याची पद्धती योग्य असली पाहिजे, प्रत्येक वेळी व्यायाम करताना त्या व्यायामाचे नियम वाचून घ्यावेत त्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली असते. श्वास कधी घ्यावा कधी सोडावा हे देखील त्यामध्ये सांगितलेले असते त्यानुसार त्याचा अवलंब करून श्वास घेण्याच्या क्रियेमध्ये बदल करावा.

योग्य हालचाल (Proper Movement)


व्यायाम करत असताना शरीराची हालचाली अतिशय काळजीपूर्वक व योग्य पद्धतीनेच करावी. कुठलाही व्यायाम करताना शरीराला झटका बसेल किंवा अचानक जोरात हालचाल करणे टाळावे.

योग्य पद्धतीने व्यायाम करण्याचे फायदे(Benefits of doing proper exercise in marathi)

मास पेशींची वाढ (Muscle development)


योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास आपल्या मास पेशींमध्ये योग्य प्रमाणात वाढ व्हायला सुरुवात होते आणि त्या सुव्यवस्थित काम करायला लागतात. योग्य पद्धतीने तानल्या गेल्यामुळे मास पेशींची स्ट्रेचिंग पावर वाढते ज्यामुळे त्यांच्यात ताकद निर्माण होते.

इंज्यूरी पासून बचाव (Injury Prevention)


शरीरातील मास पेशींना इंजुरी होण्याचा धोका हा योग्य पद्धतीने व्यायाम केल्यामुळे कमी होतो. म्हणून व्यायाम करण्याच्या योग्य पद्धतीची माहिती घेऊनच व्यायाम करावा.

व्यायाम करण्याच्या स्टेप्स(Steps for exercise)

व्यायामाची सुरुवात ही नेहमी वार्म अपने करावी. हळूहळू शरीराची हालचाल करत आपण आपले शरीर गरम करावे. सुरुवातीला सूक्ष्म व्यायाम करावेत. तसेच शरीराची स्ट्रेचिंग करावी यामुळे आपल्याला मुख्य व्यायाम करतेवेळी कुठल्याही प्रकारची इंजुरी होणार नाही.
मुख्य व्यायाम हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हे व्यायाम करत असताना आपल्याला आपली सर्वात जास्त एनर्जी खर्च करावी लागते. ज्यामुळे आपले वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. हे मुख्य व्यायाम प्रकार करत असताना आपल्या शरीराची स्थिती योग्य ठेवून मगच व्यायाम करावे जेणेकरून आपल्याला इंजुरी होणार नाही.
मुख्य व्यायामाच्या अंति आपण नॉर्मल स्ट्रेचिंग व्यायाम करावेत, स्ट्रेचिंग चे व्यायाम करणे खूप म्हणजे खूप महत्त्वपूर्ण आहे मुख्य व्यायाम प्रकार करत असताना शरीरावर आलेला ताण यामुळे नाहीसा होतो. हे सूक्ष्म स्ट्रेचिंग व्यायाम आपल्याला करावेच लागतील.

सातत्य आणि नियमितता(Consistency)

  • आपल्यापैकी बरेच जण काही दिवस व्यायाम करतात व परिणाम दिसत नाही म्हणून लगेच बंद करतात. परंतु हे चुकीचे आहे आपण एकदा व्यायामाला सुरुवात केल्यानंतर, सातत्य ठेवणे गरजेचे आहे.
  • आपल्या डोळ्यासमोर एक लक्ष असले पाहिजे जेणेकरून आपल्याला व्यायाम करण्यासाठी प्रेरणा मिळत राहील.
  • व्यायामाच्या अगदी सुरुवातीला जास्त अवघड व्यायाम प्रकार करू नये, जर या व्यायामांनी त्रास झाला तर व्यक्ती व्यायाम करणे सोडून देतो. सोपे सोपे व्यायाम करत मग कठीण व्यायाम प्रकार करावे.
  • सातत्याने रोज रोज व्यायाम करत गेल्यास आपल्या शरीराला त्याची सवय लागते, मग व्यायाम करण्याचा कंटाळा येत नाही.
  • व्यायाम करण्यासाठी आपल्यासोबत आपला मित्र किंवा आपल्या परिवारातील एखादा सदस्य सोबत घ्यावा जेणेकरून एकट्याला व्यायाम करणे कंटाळवाणे वाटणार नाही.
  • व्यायामा मध्ये देखील अनेक प्रकार आहेत त्यापैकी वेगवेगळे व्यायाम करत रहावे जेणेकरून व्यायामाची आवड कायम राहील.

आपल्याला हे दिखील वाचायला आवडेल

कमरेच्या मसल्स मध्ये आहेत खूप वेदना तर करा ही योगासने वेदना होतील गायब

‘या’ उपायांमुळे पांढरे केसही होऊ लागतील पहिल्यासारखे काळेभोर

सर्वांगीण आरोग्यासाठी करा ज्ञान मुद्रा. आश्चर्यचकित करणारे फायदे येतील समोर

रात्री झोप व्यवस्थित येत नाही, तर या पोषक तत्वांची कमी असू शकते.

1 thought on “योग्य पद्धतीने व्यायाम कसा करावा, सोप्या पण असरदार टिप्स.(10 Tips for Proper Exercise/Vyayam Techniques in marathi)”

  1. फार सुरेख माहिती आहे प्रत्येकाने त्याचे योग्य आचरण करायला हवे

    Reply

Leave a Comment