आपल्यापैकी प्रत्येकालाच शांत आणि पुरेशी झोप व्हावी असे वाटते पण आजकाल मोबाईल,टीव्ही या साधनांमुळे,अवेळी जेवणामुळे अनिद्रेची(Sleep Apnea) समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे.अनिद्रेमुळे बरेच लोक रात्रभर एका अंगावरून दुसऱ्या अंगावर झोप येण्यासाठी प्रयत्न करत असतात परंतु झोप काही येत नाही. याची अनेक कारणे आहेत त्यातीलच एक कारण म्हणजे विटामिन ची कमतरता ही विटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या गोष्टी खाऊ शकता..
रात्री झोप जर व्यवस्थित नाही झाली तर आपला पुढचा दिवस एकदम थकल्यासारखा आणि आपल्याला अतिशय आळस आल्यासारखे वाटते, कुठल्याही कामांमध्ये मन लागत नाही. म्हणूनच शरीर निरोगी राहण्यासाठी आणि ताजेतावानी राहण्यासाठी आपल्याला पुरेशी झोप घेणे खूप गरजेचे आहे जर तुम्हाला अनिद्रेचा त्रास असेल तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या तब्येतीवर होऊ शकतो.
आता आपण माहिती घेऊ अशा विटामिन्स बद्दल ज्याच्या कमतरतेमुळे आपल्याला अनीद्रेची समस्या होऊ शकते.
विटामिन डी
शरीरात विटामिन डी च्या कमतरतेमुळे झोप न येण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पद्धतीने अस्वस्थ वाटते. विटामिन डी च्या कमतरतेमुळे आपल्या झोपण्यामध्ये अनियमितता येऊ शकते. एवढेच नाही तर आपल्याला नेहमी अस्वस्थता देखील जाणवू शकते ज्यामुळे आपली झोप पूर्ण होत नाही.
विटामिन बी6
मेलाटोनिन आणि सेराटोनिन या दोन हार्मोनच्या कमतरतेमुळे आपल्याला गाढ झोप येण्यास अडथळा निर्माण होतो. या हार्मोनची पातळी आपल्या शरीरात वाढवण्यासाठी विटामिन बी6 ची गरज असते जर विटामिन बी सिक्स आपल्या शरीरात नसेल किंवा कमी प्रमाणात असेल तर आपल्याला अनिद्रेचा त्रास होऊ शकतो.
विटामिन ची कमतरता कशी भरून काढावी.
विटामिन डी
सकाळी सूर्य उगवल्यानंतर कोवळ्या उन्हामध्ये काही वेळ फिरा कोवळ्या उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे आपल्या शरीरातील विटामिन डी ची पातळी वाढते.
दूध दही पनीर मशरूम या प्रकारचे विटामिन युक्त असलेले पदार्थ खा.
संत्र्याचा रस घेतल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरात विटामिन डी वाढू शकते.
विटामिन बी6
विटामिन बी6 ची कमतरता भरून काढण्यासाठी नियमितपणे दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर दूध प्यावे.
बदाम,सोयाबीन,शेंगदाणे,ओट्स या गोष्टीच्या सेवनाने देखील विटामिन बी6 ची वाढ होवू शकते.
आप इसे भी पढ़ सकते हैं –
ब्रेन पावर बढ़ाने के लिए असरदार एक्सरसाइज और टिप्स
वेट लॉस चूर्ण: वजन घटाने का आसान और आयुर्वेदिक तरीका
बवासीर से राहत: कारण, लक्षण, घरेलू उपचार
सर्दी, खांसी और जुकाम को रोकने के लिए 10 असरदार उपाय