लवंग असा एक अद्भुत मसाला आहे जो आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये असतोच. अनेक वर्षापासून आपण याचा वापर करत आलो आहोत. लवंग चा वापर आपण जेवणामध्ये विशेष करून मिठाई आणि मसालेदार पदार्थांमध्ये करतो.
याचा उपयोग केल्याने अनेक लहान-मोठ्या आजारांपासून आपली सुटका होते जसे की सर्दी ताप तसेच यामुळे पचन व्यवस्था सुधारते.
लवंग चे आरोग्यासाठी फायदे
पाचन सुधारते
आपले खाल्लेले अन्य पचवण्यासाठी लवंग हे अतिशय फायदेशीर आणि पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त असा मसाल्या चा पदार्थ आहे. याच्यामध्ये अँटिइनफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे पोटाचे बरेच त्रास कमी होतात.
श्वसनक्रिया मजबूत करण्यासाठी
लवंग मध्ये असणारे गुण हे आपले श्वास तंतू मजबूत करतात ज्यामुळे आपल्याला सर्दी जुकाम यासारखे त्रास होण्याची शक्यता कमी असते. त्याचबरोबर दम्यासारख्या दीर्घ आजारात सुद्धा लवंग अतिशय फायदेशीर ठरते. आपल्याला श्वास घेण्यासाठी आपल्या श्वास तंतूंना मजबूत करण्याचे काम लावून करते. तसेच खोकल्यापासून सुद्धा आपला बचाव करण्याचे काम लावून करते
औषधीय गुण
- लवंग ही एक शक्तिशाली बॅक्टेरियल आणि अँटी फंगल आयुर्वेदिक औषधे आहे. जे आपल्याला विविध प्रकारच्या साथीच्या आजारापासून वाचवण्याचे काम करते. आपल्या शरीरातील अनेक वाईट बॅक्टेरिया आणि फंगस नष्ट करण्याचे सामर्थ्य लवंग मध्ये असते.
- लवंग मध्ये असलेले अँटी इन्फ्लामेट्री गुण हे आपल्याला शरीरातील वेगवेगळ्या दुखण्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत करते. विशेष करून स्त्रियांमध्ये मासिक पाळी मध्ये होणारे त्रास कमी होतात.
सौंदर्य आणि आरोग्य
त्वचेसाठी उपयुक्त
लवंग पासून तयार केलेले तेल हे आपल्या स्किन साठी उपयुक्त ठरते. याच्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुण असतात ज्यामुळे त्वचेला सुरक्षित राहण्यास मदत होते. तसेच स्किन मॉइश्चराईज करण्यासाठी सुद्धा या तेलाचा उपयोग केल्यास त्वचा चमकदार स्वस्थ आणि निरोगी होते.
दातांचे आरोग्य
लवंग दाताच्या आरोग्यासाठी एक अद्भुत आणि अद्वितीय औषधी मानली जाते. लवंग मध्ये असलेले अंटीबॅक्टरियल गुण दातांचे संरक्षण करतात आणि हिरडे मजबूत करण्यास मदत करतात. हिरड्या सुजणे दात दुखणे तसेच हिरड्याचे अनेक आजार यासाठी लवंग फायदेशीर ठरू शकते.
याव्यतिरिक्त आपण लवंग चा वापर जेवणामध्ये सुद्धा करू शकतो. अनेक मिठाईंमध्ये लवंग वापरली जाते. ज्यामुळे त्या पदार्थाला एक स्वादिष्ट अशी वेगळीच चव प्राप्त होते. तसेच अनेक मसालेदार पदार्थांमध्ये लवंगचा वापर केला जातो. वेगवेगळ्या भाज्या डाळ आणि अनेक चविष्ट व्यंजन यामध्ये लवंग वापरली जाते.
सुरक्षित वापर
लवंग जरी अनेक वर्षांपासून आपण वापरत आलो असलो तरी त्याचा योग्य प्रमाणात वापर करणे अतिशय गरजेचे असते. जास्त प्रमाणात याचे सेवन केल्यास आपल्याला नुकसान सुद्धा होऊ शकतात. म्हणून आपल्याला नुकसान होऊ नये त्याची काळजी आपण स्वतःच घ्यायला पाहिजे. जेणेकरून आपल्याला लवंग चा आपल्या आरोग्यासाठी उपयोग करून घेता येईल.
लवंग मध्ये असलेल्या याच गुणांमुळे आणि सहज उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक जण लवंगी चा वापर करत असतो. म्हणून तुम्ही सुद्धा आपल्या आहारामध्ये लवंग वापरायला सुरुवात कराल असे मला वाटते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व कुठल्या विषयावरती तुम्हाला माहिती वाचायला आवडेल हे देखील कळवा. धन्यवाद.
FAQ (Frequently asked Questions)
Q- लवंगचा अति वापर करणे सुरक्षित आहे का?
A- नाही, लवंगी नेहमी प्रमाणातच वापरावी. अति प्रमाणात याचे सेवन केल्यास आपल्याला नुकसान होऊ शकतात.
Q-लहान मुलांना आपण लवंग देऊ शकतो का?
A – हो. आपण लहान मुलांना सुद्धा लवंग खायला देऊ शकता पण त्याचे प्रमाण योग्य असावे.
Q – लवंग पासून बनवलेले तेल आपण त्वचेसाठी वापरू शकतो का?
A – हो. लवंग पासून बनवलेले तेल हे आपल्या स्किन साठी अतिशय उपयुक्त असते. त्वचेला मॉइश्चराईस करून आपली त्वचा सॉफ्ट आणि निरोगी ठेवण्यास हे तेल उपयोगी असते.
It was very informative and beneficial.Thank you.