आयुष्यभर निरोगी राहायचे आहे मग योगासनां शिवाय पर्याय नाही.(Health benefits of yogasanas in marathi 2024)

आयुष्यभर निरोगी राहायचे आहे मग,मानसिक स्वास्थ्य,Health benefits of yoga,योगासनाचे फायदे,Health benefits of yogasanas in marathi)

योग या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. व्यक्तीला शारीरिक मानसिक आणि अध्यात्मिक रूपाने जोडण्याचे महत्त्वपूर्ण आणि अद्वितीय काम हे योग करते. आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी आपण योग अभ्यासाची मदत घेवून निरोगी आयुष्य जगू शकतो.योगासने च शरीर मन आणि आत्मा यांचे संतुलन शरीरात घडवून आणतात.जे आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन वाढण्यास मदत करतात.
या ब्लॉग मध्ये आपण योगासनांच्या फायद्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूयात.

योगाभ्यास ही एक प्राचीन साधना आहे ज्यामुळे माणसाला शारीरिक मानसिक आणि आत्मिक सुखाचा अनुभव होतो. योगासनांचा मुख्य उद्देश आपल्याला चांगल्या आरोग्य आणि मानसिक शांती देणे व आपल्या जीवनाला योग्य दिशा देणे हा आहे.

Health benefits of yogasanas,योगासनाचे फायदे

योगासन

योगासनांचा उल्लेख हा अनेक मोठ्या मोठ्या ग्रंथांमध्ये आलेला आहे, ज्यामध्ये भगवद्गीता व पतंजली योग सूत्र हे मोठे ग्रंथ देखील समाविष्ट आहेत. पतंजली योग सूत्र आहे योगासनांचा मुख्य आधार आहे ज्यामध्ये योगासनांचा उल्लेख हा खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे. स्थिरसुखमासनम् म्हणजेच स्थिर आणि सुखी राहण्यासाठी आसन.
भगवद्गीते मध्ये सुद्धा योगासनाचा उल्लेख आढळतो, श्रीकृष्णाने अर्जुनाला योगाच्या साह्याने आपल्या जीवनाचा योग्य मार्ग कसा मिळवता येतो याचे विस्तृत वर्णन केले आहे. ज्यामध्ये श्रीकृष्णाने योगासनाचा लाभ हा आपल्याला शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर कसा होतो हे स्पष्ट केले आहे.

योगासनांचा इतिहास

भारताच्या समृद्धीचा आणि सभ्यतेचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे योगासने. वेद आणि उपनिषदांमध्ये योगासनाच्या सिद्धांताचे वर्णन आपल्याला पाहायला मिळते. ज्यामध्ये आपल्याला योगासनांच्या मदतीने शरीराला आत्मिक सुख कसे मिळवता येईल याबद्दल अद्वितीय असे मार्गदर्शन केले आहे. प्राचीन काळात योगासने हे प्रत्येक गुरुकुल मध्ये एक महत्त्वपूर्ण आणि अनिवार्य असा भाग होता. अनेक योगी आणि ऋषींनी वेगवेगळ्या आसनांचा विकास केला आहे. आज आपण जे योग करतो ते पूर्वीच्या काळापासून पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहेत. योगासने जर नीट समजून घेतली तर आपल्याला आपल्या संस्कृतीवर अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही प्रकारच्या आजारावर योगासने कसे प्रभावी आहेत हे कित्येक वर्षांपूर्वीच आपल्याला आपल्या योगी व ऋषीमुनींनी दाखवून दिले आहे. चला तर पाहूया योगासनाचे फायदे

योगासनाचे फायदे

शारीरिक फायदे


शरीर सुदृढ बनवण्यासाठी योगासन हा आपल्या जीवनाचा भाग असायलाच हवा. योगासनामुळे आपल्या मास पेशी मजबूत होतात आणि शरीराची संरचना सुधारते.
योगासनांमुळे आपले आपले श्वासावर नियंत्रण वाढते. ज्यामुळे आपण मोठे श्वास घेऊ शकतो, ज्यामुळे आपली श्वास रोखून धरण्याची क्षमता वाढते.
योगासनामुळे आपल्या शरीरातील रक्तसंचार सुधारतो त्यामुळे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होण्यास मदत होते.
आपल्या शरीरातील ऊर्जा योगासनांमुळे वाढते व आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटते.

मानसिक फायदे


योगासनांमुळे आपल्याला आलेला मानसिक ताण आणि चिंता कमी करण्यास मदत होते ज्यामुळे मानसिक स्थितीत सुधार होतो व व्यक्ती प्रसन्न राहतो.
योगासनामुळे मानसिक आरोग्य सुव्यवस्थित होते ज्यामुळे आपले चैतन्य वाढते व आपल्याला आपल्या आत्म्यासोबत जोडण्याची संधी प्राप्त होते. ज्यामुळे आपण आपल्या जीवनाचा खरा अर्थ जाणू शकतो.
म्हणूनच सर्वसाधारण समस्या आहे योगासने फक्त शारीरिक स्वास्थ्य देतात परंतु योगासनांमुळे शारीरिक आणि मानसिक तसेच आध्यात्मिक स्वास्थ्य देखील आपल्याला मिळते.

Health benefits of yogasanas,योगासनाचे फायदे

योगासने करण्याची वेळ

सकाळची वेळ


सकाळची वेळ ही योगासने करण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि चांगली असते. सूर्योदयाच्या वेळी योगासनांचा अभ्यास करणे हे शरीराला ऊर्जा देणारे ठरते. आपला मानसिक स्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी सकाळची वेळ खूप उपयुक्त असते. सकाळच्या वेळी वातावरण अगदी शांत आणि प्रसन्न असते. ज्यामुळे सकाळची वेळी व्यायाम केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभते.

सायंकाळची वेळ


ज्यांना सकाळी व्यायाम करणे शक्य नाही अशा व्यक्तींसाठी सायंकाळची वेळ सुद्धा उपयुक्त ठरू शकते. दिवसभराची धावपळ आणि थकवा यामुळे आलेला तणाव कमी करण्यासाठी अनेक योगासने आहेत जे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य ढळू देत नाहीत. रात्रीच्या वेळी व्यायाम केल्याने दिवसभराचा आलेला थकवा कमी होतो. रात्री शांत व गाढ झोप लागण्यासाठी सुद्धा सायंकाळी केलेले योगासने मदत करतात.

योगासने करते वेळी हे लक्षात ठेवा

सातत्य आणि नियमितता


योगासनांचा नियमितपणे आणि सातत्याने अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. निमित्त आणि सातत्य ठेवले तरच योगासनाचे लाभ आपल्याला मिळतील. अन्यथा त्याचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणून तर म्हटले जाते एखादी लहान गोष्ट सुद्धा अनेक काळापर्यंत करत राहिल्यास त्याचे चमत्कारिक फायदे आपल्याला होतात.

मार्गदर्शक


योगासनेही योग्य पद्धतीनेच केली पाहिजेत. योग्य पद्धत माहिती करून घेऊनच योगासने केली तर त्याचा फायदा होतो. योग्य पद्धतीने व्यायाम कसा करावा हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. आपण एखादा प्रशिक्षक सुद्धा आपल्या मदतीला घेऊ शकतो, वेगवेगळ्या पुस्तकातून व्हिडिओतून सुद्धा आपण योगासने कसे करावे याबद्दल माहिती घेऊ शकतो. परिपूर्ण माहिती घेऊन आणि शिकूनच योगासने केली तर आपल्याला त्याचा फायदा होतो.

सुरक्षिततेसाठी उपाय


एखाद्या नव्या असण्याची सुरुवात करताना आपल्या प्रशिक्षकाला विचारूनच ते आसन सुरू करावे.
शरीर अति जास्त ताणून किंवा शरीराला जास्त त्रास करून योगासने करू नये आपल्याला जेवढे शक्य आहे त्या प्रमाणातच योगासने करावे.
जे योगासन आपण करत आहोत त्या योगासनाबद्दल संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय ते करू नये.
एखादा व्यक्ती आजारी असल्यास किंवा एखादा मोठा त्रास असल्यास आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योगासने सुरू करावी.
योगासने झाल्यानंतर योग्य स्ट्रेचिंग आणि शवासनाचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे.

या सर्व माहितीचा आधार घेऊन आपण योगासनांना सुरुवात करूया व शारीरिक मानसिक आणि अध्यात्मिक सुखाचा लाभ घेऊया. लक्षात ठेवा आरोग्य ही खूप मोठी संपत्ती आहे, जी एकदा हातातून निसटले की निसटलीच म्हणून वेळ जाण्या आधीच योगासनांना सुरुवात करा आणि निरोगी व आनंदी आयुष्य जगा.

Leave a Comment