आपल्याला आरोग्याच्या सर्व समस्यांपासून दूर राहायचे असेल प्राणायाम आणि योग हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असला पाहिजे. यामुळे आपल्याला शारीरिक बळ तर मिळतेच पण त्याच बरोबर भावनात्मक आणि मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा योग अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
आजकाल मॉडर्न लाईफस्टाईल व व्यस्त दिनचर्या यामुळे माणसाला वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक आजारांचा सामना करावा लागत आहे.सतत कामात व्यस्त असल्यामुळे व धावपळीच्या युगात खूप साऱ्या जबाबदाऱ्या मुळे भावनात्मक दृष्टीने माणूस खचून जात आहे.
म्हणूनच या सर्व समस्यांपासून सुटका व्हावी असे वाटत असेल तर योग आणि प्राणायाम हा एक उत्तम मार्ग आहे. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी योगा आणि प्राणायामाला इतके महत्त्व दिले आहे.
पूर्वीच्या काळापासून ऋषीमुनींनी या योगमुद्राच्या साह्याने आपले मानसिक आणि भावनात्मक आरोग्य अतिशय व्यवस्थित ठेवले होते. ही मुद्रा तुमच्या शरीरामध्ये ऊर्जेचा संचार करते आणि मनुष्याला मानसिक त्रासापासून दूर करते.
ज्ञानमुद्रा म्हणजे नेमकं काय?
आरोग्य नीतीच्या टीमने अनेक जुन्या पुस्तकांचा अभ्यास केल्यानंतर त्यामध्ये असे निदर्शनास आले की ज्ञानमुद्रेला ध्यानमुद्रा असे देखील म्हटले जाते. या मुद्रेचा उपयोग प्राणायाम किंवा योग करताना मनाला एकाग्र करण्यासाठी केला जातो या योगमुद्राच्या साहाय्याने आपल्याला मानसिक शांती मिळते. तसेच या अभ्यासात असे लक्षात आले की ज्ञान मुद्रेचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीमध्ये शरीर आणि मनावर खूप मोठा प्रभाव दिसून येतो म्हणूनच या मुद्रेला योगा मध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे.
मानसिक दृष्टीने ज्ञानमुद्रा कशी उपयोगी आहे?
आजकाल धावपळीच्या आणि व्यस्त दिनचर्या च्या युगात माणसाला एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात म्हणून प्रत्येकामध्येच एकाग्रतेची कमी दिसून येत आहे. म्हणूनच ध्यान अभ्यास आणि इतर सर्व कार्य करण्यासाठी आपले मन एकाग्र असणे खूप गरजेचे आहे.
ज्ञानमुद्रा लोकांची एकाग्रता वाढवते आणि एखाद्या गोष्टीवर फोकस करण्याची क्षमता वाढवते. माणसाला होणाऱ्या अनेक चिंतांपासून या मुद्रेचा अभ्यासामुळे मुक्ती मिळते आणि मानसिक तणाव आल्यावर तो कसा हाताळावा हे देखील व्यक्तीला समजते.
शारीरिक दृष्टिकोनातून ज्ञानमुद्राचा उपयोग?
आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार ज्ञानमुद्रा ही शरीरातील वायूला संतुलित करण्याचे काम करते. मुळे शरीरातील नर्व्हस सिस्टीम मजबूत होते व शरीराच्या हालचाली मध्ये सुद्धा कमालीचा फरक दिसून येतो. शरीराच्या सर्वांगीण कार्यामध्ये सुधारणा होते. शरीरातील हार्मोन्स मध्ये निर्माण झालेले असंतुलन व्यवस्थित करण्यासाठी ज्ञानमुद्रा खूप उपयोगी आहे.
ज्ञानमुद्रा करण्याची पद्धत
ज्ञानमुद्रा करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पद्मासन किंवा सुखासनामध्ये बसावे लागेल. या आसनामध्ये निवांत बसल्यानंतर आपल्या पाठीचा मणका सरळ आहे का याकडे लक्ष ठेवा.
त्यानंतर आपल्या हातांना गुडघ्यावरती ठेवा. त्यानंतर हाताचे तळवे आकाशाच्या दिशेला करून आपला अंगठा व अंगठ्या शेजारील बोट म्हणजेच इंडेक्स फिंगर हे एकमेकांना चिकटवा.
त्यानंतर आपले डोळे सावकाश मिटून श्वासावरती लक्ष केंद्रित करा. हळूहळू आपल्या दोन्ही भुवयांच्या मधोमध आपले लक्ष केंद्रित करा.
या मुद्रामध्ये तर रोज कमीत कमी 30 मिनिटे तरी बसा, सातत्याने या मुद्रेचा अभ्यास केल्यास वरील सांगितलेले सर्व फायदे आपल्याला होतील.
Very nice information!